Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More

Slide Background
ओबीसी अधिकारी कर्मचारी संंघ
भारतीय राज्यघटनेवर निष्ठा असणाऱ्या सर्व समाजघटकांमधे आणि ओबीसीसह इतरही वर्गांमधे सुसंवाद ठेवून बंधूभाव निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य हे संघटन करीत आहे.
Slide Background
ओबीसी अधिकारी कर्मचारी संंघ
भारतीय राज्यघटनेवर निष्ठा असणाऱ्या सर्व समाजघटकांमधे आणि ओबीसीसह इतरही वर्गांमधे सुसंवाद ठेवून बंधूभाव निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य हे संघटन करीत आहे.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संंघ

भारतीय राज्यघटनेवर निष्ठा असणाऱ्या सर्व समाजघटकांमधे आणि ओबीसीसह इतरही वर्गांमधे सुसंवाद ठेवून बंधूभाव निर्माण करण्याचे महत्त्वाचेकार्य हे संघटन करीत आहे.

ओबीसी अधिकारी कर्मचारी वर्गाच्या न्याय व हक्कासाठी लढणार

img8

ओबीसी अधिकारी कर्मचारी संंघ

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे, बिगर राजकीय संघटनेची स्थापना वर्ष 2018 मध्ये करण्यात आली.

समाजातील प्रत्येकाला ओबीसी साक्षर करणे हे ध्येय आहे. सामाजिक न्यायाबद्दल समाजामध्ये जाणीव व जागृती निर्माण करणे, भारतीय राज्यघटनेवर निष्ठा असणाऱ्या सर्व समाजघटकांमध्ये व ओबीसीसह इतरही वर्गांमध्ये सुसंवाद ठेवून बंधूभाव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे संघटन करीत आहे. ओबीसी समाजाला आपल्या हक्कांबाबत जागरूक करणे ही महत्वाची उद्दिष्टे ठेवून, प्रशिक्षण, प्रबोधन व संघटन या तीन माध्यामातून ओबीसी मधील जातीय चेतना नाहीशी करून, वर्गीय चेतना निर्माण 

करणे, सामाजिक समता निर्माण होण्यासाठी, सर्व समाजघटकांना समान प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. यासाठी संघटनेच्या माध्यामातून अल्पकालीन व दिर्घकालीन कार्यक्रम आखण्यात आले आहे. यामध्ये ओबीसी समाजाच्या तात्कालीक प्रश्नांपासून तर भविष्यात ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करणे, हे सुद्धा महत्वाचे आहे. यासाठी ओबीसींची नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासीठी जातीनिहाय जनगणना होणे अत्यंत महत्वाचे आहे.

ब्रिटीश काळात 1931 साली जातीनिहाय जनगणना झाली होती, तद् नंतर आजतागायत ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालेली नाही. म्हणून ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी तसेच मंडल आयोगाची 100 टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या ओबीसी कर्मचाऱ्यांमधील समन्वय वाढवून सेवाविषयक सर्व अडचणी नियमितपणे सोडविण्याचे, पदोन्नतीमधे आरक्षण मिळवून देण्याचे, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि विविध शिष्यवृत्त्यांचे लाभ मिळवण्यासाठी व नॉन क्रिमिलेयरची उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ करीत आहे.

धेय्य आणि उद्देश

प्रशिक्षण

प्रशिक्षण

अधिकारी कर्मचारी वर्गात, सामुहीक स्वरूपाची भावना विकसित करणे, त्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोनात व्यापकता आणणे. नव्या तंत्रज्ञानाचा समाजपरिवर्तनासाठी सुयोग्य वापर करण्यास शिकवणे. आत्मनिर्भर, स्वतंत्र आणि स्वावलंबी दृष्टिकोन विकसित करून निर्णयक्षमता वाढवण्यासाठी विविध प्रशिक्षणात्मक कार्यशाळा आयोजित करणे.

प्रबोधन

प्रबोधन

कर्मचारी अधिकारी वर्गाच्या हक्क, शासकीय अध्यादेश, कायदे इत्यादीसंबंधित अद्ययावत माहीती उपलब्ध करून देणे. आरक्षण, सामाजिक न्याय आणि सामाजिक प्रतिनिधित्वाबद्दल संकल्पना स्पष्ट करून त्याबद्दल प्रबोधनात्मक कार्यक्रमातून जाणीव आणि जागृती निर्माण करणे. स्वावलंबी दृष्टिकोन विकसित करून निर्णयक्षमता वाढवण्यासाठी विविध प्रशिक्षणात्मक कार्यशाळा आयोजित करणे.

संघटन

संघटन

ओबीसी अधिकारी कर्मचारी वर्ग विविध जातीपातींत विखुरलेला आणि विभागलेला आहे. जातीय चेतना नाहीशी करून वर्गीय अस्मिता जागृत करणे तसेच संघटित राहण्याचे महत्व पटवून देणे.

संघर्ष

संघर्ष

कर्मचारी अधिकारी वर्गाच्या हक्क, शासकीय अध्यादेश, कायदे इत्यादीसंबंधित अद्ययावत माहीती उपलब्ध करून देणे. आरक्षण, सामाजिक न्याय आणि सामाजिक प्रतिनिधित्वाबद्दल संकल्पना स्पष्ट करून त्याबद्दल प्रबोधनात्मक कार्यक्रमातून जाणीव आणि जागृती निर्माण करणे.

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेला डोनेशन देण्यासाठी बटण वर क्लिक करा.

ओबीसी अधिकारी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन ही नोंदणीकृत असून तिचा नोंदणी क्रमांक ३०५ आहे. आपण या संघटनेला दिलेली सामाजिक देणगी ही पूर्णतः १२अ व ८०जी अंतर्गत करमुक्त आहे.

लाईव्ह अपडेट

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा